Home शहरे अकोला राज्यपाल झाले निक्षय मित्र; क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट – महासंवाद

राज्यपाल झाले निक्षय मित्र; क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट – महासंवाद

0
राज्यपाल झाले निक्षय मित्र; क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट – महासंवाद

            मुंबई, दि. 11 : क्षयरोग निर्मूलनाच्या राष्ट्रीय कार्यात लोकसहभाग वाढावाक्षयरोग रुग्णांना पोषण आहारासाठी मदत व्हावी यादृष्टीने सुरु केलेल्या प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला प्रतिसाद देत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे एका क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट दिला. 

            निक्षय मित्र‘ या नात्याने आपण संबंधित क्षयरोग रुग्णाच्या पोषण आहाराची पुढील एक वर्षाकरिता जबाबदारी स्वीकारत असल्याचे राज्यपालांनी यावेळी जाहीर केले. 

            राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम सफल करण्यासाठी नागरिकसामाजिक संस्था तसेच कॉर्पोरेट क्षेत्राने पुढे येऊन निक्षय मित्र होण्याचे आवाहन राज्यपालांनी केले. क्षयरोग रुग्णांना देण्यात येणाऱ्या पौष्टिक आहार संचामध्ये कडधान्यडाळीतेलदूध पावडरअंडीफळे व सुकामेवा यांचा समावेश आहे.  

            यावेळी बृहन्मुंबईचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेश पाटीलराज्यपालांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद शिंदेडी व ई वॉर्ड क्षयरोग अधिकारी डॉ. ओंकार तोडकरीडॉ. पृथ्वीराज राजोळे व श्री. शशांक बंडकर उपस्थित होते.