Home बातम्या ऐतिहासिक राज्यपाल रमेश बैस यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

राज्यपाल रमेश बैस यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

0
राज्यपाल रमेश बैस यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

मुंबई, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार सदानंद सरवणकर, मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल,  श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बृहन्मुंबई महानगर पालिका व श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले होते.

अभिवादन सोहळ्यानंतर राज्यपाल क्रीडा भवन येथे महानगरपालिकेतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील उपस्थित राहिले. आज प्रथमच राष्ट्रगीतासोबत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत देखील गायले गेले. यावेळी महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा, समूहगायन व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

 

०००

 

Governor Bais garlands statue of Chhatrapati Shivaji Maharaj on Shiv Jayanti

The newly appointed Maharashtra Governor Ramesh Bais garlanded the equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj at the Chhatrapati Shivaji Maharaj Maidan (Park) in Mumbai on the occasion of Shiv Jayanti on Sunday (19th Feb).

Governor Ramesh Bais later participated in the Shiv Jayanti celebrations organised by the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) at Krida Bhavan and listened to the patriotic songs on the life of Chhatrapati Shivaji Maharaj. The musical programme was presented by the Sangeet Kala Academy of BMC. For the first time this year, the State song ‘Jai Jai Maharashtra Majha’ was sung along with the National Anthem.

MLA Sadanand Sarvankar, Brihanmumbai Municipal Commissioner I S Chahal, Chairman of the Shri Chhatrapati Shivaji Maharaj Smarak Samiti Kisan Jadhav, Additional Municipal Commissioner P. Velarasu, officials and invitees were present.

 

०००