राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांनी रायगडमधील जिल्हा परिषदेच्या पंधरा शाळांना मिळणार आदर्श रूप – महासंवाद

राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांनी रायगडमधील जिल्हा परिषदेच्या पंधरा शाळांना मिळणार आदर्श रूप – महासंवाद
- Advertisement -

अलिबाग,दि.28 (जिमाका) – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेच्या काही शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. त्यासाठी राज्याच्या शिक्षण व क्रीडा विभागाने ज्या शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करायचे आहे. त्या शाळांसाठी निधी वितरीत केला आहे.

रायगड जिल्ह्यातील पंधरा शाळांचा समावेश आदर्श शाळा म्हणून समावेश करण्यात आला असून यामध्ये अलिबाग तालुक्यातील वाईशेत जि.प.शाळा, कर्जत तालुक्यातील कळंब जि.प.शाळा, खालापूर तालुक्यातील चौक जि.प.शाळा, महाड तालुक्यातील वहूर जि.प.शाळा, माणगाव तालुक्यातील तळाशेत जि.प.शाळा, म्हसळा तालुक्यातील खरसई मराठी प्राथमिक जि.प.शाळा, मजगाव ता.मुरूड मराठी जि.प.शाळा, वावेघर ता.पनवेल जि.प.शाळा, आमटेम ता.पेण जि.प.शाळा, लोहरे ता. पोलादपूर जि.प.शाळा, कोलाड ता.रोहा येथील जि.प.प्राथमिक केंद्रीय शाळा, श्रीवर्धन तालुक्यातील मौजे वडवली येथील मराठी जि.प.मराठी शाळा, वाघोशी ता.सुधागड जि.प.प्राथमिक शाळा, तळा तालुक्यातील वाशी हवेली जि.प.शाळा, उरण तालुक्यातील मोठी जुई येथील जि.प.प्राथमिक शाळा यांचा समावेश आहे.

     या प्राप्त निधीतून शाळांमध्ये आवश्यक मोठे बांधकाम करण्यात येणार आहे. यामुळे सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळण्याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करण्यासाठी मदत होणार आहे. या उपलब्ध निधीच्या माध्यमातून शाळांचा दर्जा वाढणार असून विविध स्तरावर या शाळांचा विकास केला जाईल, असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

000000

मृद व जलसंधारण विभागाची रायगड जिल्ह्यात चार उपविभागीय कार्यालय तर अलिबाग येथे मुख्यालय सुरु होणार

पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या मागणी मान्य

अलिबाग,दि.28 (जिमाका) – मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा जलसंधारण अधिकारी व उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये नव्याने कार्यान्वित करणे व सर्व उपविभागीय कार्यालयांचे तालुका कार्यक्षेत्र घोषित करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा मुख्यालय कार्यान्वित करण्यात आले असून या अंतर्गत रायगड जिल्ह्यातील उपविभागीय क्षेत्रातील माणगाव, कर्जत, कोलाड, अलिबाग या चार जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभागाची निर्मिती करण्याचा निर्णय शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने घेतला आहे. याबाबत रायगड पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी मृद व जलसंधारण मंत्री यांच्याकडे मागणी करीत पाठपुरावा केला होता.

विभागाच्या राज्यस्तर यंत्रणेकडील कामकाजाची व्यापकता व यंत्रणेवरील कामाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने राज्यस्तर यंत्रणेकडील जिल्हा कार्यालये आणि उपविभागीय कार्यालये यांची संख्या काही प्रमाणात वाढ केल्यास राज्यस्तर यंत्रणा व जिल्हा परिषद यंत्रणा यांचा समतोल साधला जाऊन मनुष्यबळाचा योग्य वापर होण्यास मदत होणार आहे.

या नवीन रचनेमुळे जलसंधारण विभागाचे रायगड जिल्ह्यातील कामकाज गतिमान होणार आहे.

00000

- Advertisement -