Home शहरे उस्मानाबाद राज्यात गांजा लागवडीस परवानगी देण्याची शेतकऱ्याची शासनाकडे मागणी!

राज्यात गांजा लागवडीस परवानगी देण्याची शेतकऱ्याची शासनाकडे मागणी!

तुळजापूर – शेतमालास हमीभाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय सातत्याने तोट्यात जात असुन त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आल्याने शेतकऱ्यांना गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी दहीवडी ता. तुळजापूर येथील शेतकऱ्याने तहसिलदार यांना निवेदन देवुन केली.
आहे.

गणेश हरिदास गायकवाड या शेतकऱ्याने निवेदनात म्हटलं आहे की माझी शेती मौजे दहीवडी येथे गट नंबर 329मध्ये आहे.गेली अनेक वर्षापासुन माझ्या कुंटुंबाची उदारनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. आम्ही शेती करीत असल्या पासुन शेती तोट्यात आहे. शाषणाने शेतमालास हमी भाव देणे बंधनकारक असताना तो दिला जात नाही भाजीपाल्यास भाव मिळत नाही या मुळे शेतकरी कुंटुंब अर्थिक अडचणीत आले आहे.

उत्तराखंड सरकारने 2015 साली गांजा लागवड कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला गांजा हा केवळ नशा करण्यासाठी नसतो त्याचा उपयोग औषध बनविण्यासाठी होत असतो. शेतकऱ्यांना गांजा लागवडीस परवानगी दिली तर चोरटी गांजाची शेती बंद होणार आहे आणि शेतकऱ्यांना अर्थिक उत्पन्न मिळेल. शेतकऱ्यांचे अर्थिक बळकटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गांजा लागवडीस परवानगी द्यावी त्यामुळे शेतकऱ्यांना नवीसंजीवनी मिळुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असं म्हटलं आहे.