Home ताज्या बातम्या राज्यात पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून एनडीआरएफ आणि एसडी एसडीआरएफच्या १४ टीम तैनात

राज्यात पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून एनडीआरएफ आणि एसडी एसडीआरएफच्या १४ टीम तैनात

0
राज्यात पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून एनडीआरएफ आणि एसडी एसडीआरएफच्या १४ टीम तैनात

मुंबई,दि.24 : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थीती बाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत.

मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१,रायगड- महाड- २, ठाणे-२,रत्नागिरी-चिपळूण-२,कोल्हापूर-२,सातारा-१,  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १२ टीम तैनात आहेत.

नांदेड-१, गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)  च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती

राज्यात एक जून पासून आज पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व ३०९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत.४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे.

राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज  सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिध्दीसाठी देण्यात  येत आहे.

000