हायलाइट्स:
- सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नारायण राणेंची तीव्र नाराजी
- मुख्यमंत्र्यांवरही केले घणाघाती आरोप
- मराठा आरक्षण मिळू नये, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा असल्याचा घणाघात
‘सुप्रीम कोर्टाचा निर्णय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ घालणारा हा निर्णय असून मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याला हे तीन पक्षाचं सरकार आणि मुख्यमंत्री कारणीभूत आहेत. राज्यात मराठा मुख्यमंत्री असता तर हा निर्णय अपेक्षित नसता,’ असं खळबळजनक वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे.
‘मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी शिवसेनेची आधीपासून भूमिका आहे, मी शिवसेनेत अनेक वर्ष असल्याने मला हे माहीत आहे. उद्धव ठाकरे यांना आरक्षणाविषयी काहीच माहिती नाही,’ अशी घणाघाती टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.
नारायण राणे यांची घणाघाती पत्रकार परिषद; जाणून घ्या ठळक मुद्दे
– आपल्यावर अन्याय झाल्याची मराठा समाजाची भावना आहे
– आमच्या समाजाला प्रगतीपासून वंचित ठेवणारा हा निर्णय आहे
– इतर समाजाला आरक्षण मिळण्यात मराठा समाजाचा मोठा वाटा
– काहींना वाटेल संपला आता मराठा समाज, पण मराठा समाज अजून जिवंत आहे, आम्ही हा लढा सुरू ठेवू
– काही लोकांचे खायचे आणि दाखवण्याचे दात वेगळे, हे समाजाने लक्षात घ्यावं