Home ताज्या बातम्या राज्यात सध्या चाललेल्या परिस्थितीवर अनुभवी नेते शरद पवार यांनी सर्वपक्षीय मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा – भास्करराव म्हस्के

राज्यात सध्या चाललेल्या परिस्थितीवर अनुभवी नेते शरद पवार यांनी सर्वपक्षीय मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा – भास्करराव म्हस्के

0

परवेज शेख राज्यात सध्या चाललेल्या परिस्थितीवर अनुभवी नेते शरद पवार यांनी सर्वपक्षीय मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा – भास्करराव म्हस्के

पुणे : राज्यात सध्या अतिशय बिकट परिस्थिती असून सर्वात शेतकरी अडचणीत असताना राजकीय पक्ष सत्तास्थापन करण्यासाठी जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. सद्यस्थिती ही शेतकरी वर्गासाठी अतिशय आव्हान देण्याची असताना त्यांना सहानभूती न दाखविता जलद मदत करण्याची असून ही बाब जरी राजकीय नेत्यांच्या लक्षात येत असली तरी सत्तास्थापन करण्यासाठी या बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. देशात आज सर्वात अनुभवी नेते व शेती क्षेत्राची जाण असणारा नेता शरद पवार आहेत. त्यांनीच आता पुढाकार घेऊन सर्वपक्षीय एकत्रित करून सत्ता स्थापन करावी असे मत भास्करराव म्हस्के यांनी मांडले.

सत्तास्थापनेत सर्व पक्षांना ज्या प्रमाणात निवडून आलेल्या जागेनुसार वाटून मुख्यमंत्री तर राहिलेल्या राजकीय पक्षांना उपमुख्यमंत्री द्यावे पाच वर्षात सर्वांना मुख्यमंत्री पद येईल याचा कालावधी ठरवून सत्तासंघर्ष सोडवावा ज्या क्षेत्रात माहिती असणाऱ्या जाणकार नेत्याला त्या खात्याचे मंत्रिपद द्यावे तसेच उपमुख्यमंत्री हे पद मराठवाडा ,कोकण ,पश्चिम महाराष्ट्र ,विदर्भ आशा भागातील व्यक्तीला द्यावे.

सध्या राज्यात नवीन तडफदार नेतृत्व करण्याजोगे अनेक युवक निवडून आले असून त्यांना मोठ्या प्रमाणात संधी द्यावी.
राज्यात सध्याची परिस्थिती जाणणारे एकमेव नेते शरद पवार असल्याने त्यांनी यात पुढाकार घेऊन राज्याला पुन्हा योग्य दिशेला आणण्याचं काम तेच करतील असे देखील ते म्हणाले.