Home ताज्या बातम्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडून अधिकारी व कर्मचारी यांना सॅनीटायझर आणि मास्कचे वाटप

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडून अधिकारी व कर्मचारी यांना सॅनीटायझर आणि मास्कचे वाटप

0

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडून अत्यावश्यक सेवेकरिता कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना सॅनीटायझर आणि मास्क यांचे वाटप केले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध अधीक्षकांनी त्यांच्या जिल्ह्यातील अनाथ मुले, भिक्षुक, गरीब, मजूर, बेघरांना रेशन / अत्यावश्यक खाद्यपदार्थांच्या  किट्सचे  तसेच अत्यावश्यक सेवेकरिता कार्यरत अन्य विभाग जसे पोलीस विभाग, अन्न वितरण विभाग, कोषागार विभाग, दुग्धशाळा, जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच नगरपरिषद सफाई विभाग इत्यादी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सॅनीटायझर  आणि मास्क यांचे वाटप केले आहे. त्यात प्रामुख्याने अधीक्षक नागपूर, नांदेड, औरंगाबाद, यवतमाळ, पुणे आणि उस्मानाबादचा समावेश आहे.

लॉकडाऊन काळात  राज्यातील ‌ सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे  देशात व राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात  राज्यातील ‌ सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद  असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्रीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर निरंतर कारवाई सुरूच आहे.

काल दि.13 एप्रिल 2020 रोजी एका दिवसात  राज्यात 146 गुन्हे नोंदविण्यात आले असून 73 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 17 वाहने जप्त करण्यात आली असून 44 लाख 52 हजार रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 24 मार्च ते 13 एप्रिल पर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्यात 2593 गुन्हे नोंदविण्यात आले असून 1044 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 143 वाहने जप्त करण्यात आली असून 6 कोटी 33 लाख रुपये  किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 24×7 नियंत्रण कक्ष सुरू आहे . सदर नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक 18008333333 तर व्हाट्सअँप क्रमांक  8422001133 असा आहे. यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात, तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. नमूद क्रमांकावर अवैध मद्य बाबतची तक्रार नोंद करण्यात यावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे.