Home शहरे मुंबई राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयात बीएमएस डॉक्टरांची पदे भरणार – एकनाथ शिंदे

राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयात बीएमएस डॉक्टरांची पदे भरणार – एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयात एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. या रूग्णालयात बीएमएस डॉक्टरांची पदे कंत्राटी पद्धतीने भरावयाची कार्यवाही सुरू असून, महिनाभरात प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

येथे मुंबईतील राज्य कामगार विमा योजनेतील रूग्णालये आणि औषधांची दुकाने सुरू करण्यासंदर्भात सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री शिंदे बोलत होते.

श्री. शिंदे म्हणाले, कामगार विमा योजनेअंतर्गत् येणा-या रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने बीएमएस डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने एका महिन्यात भरती करण्यात येईल. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून या रूग्णालयाच्या सुविधात वाढ व्हावी, कामगारांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच डॉक्टरांच्या शुल्कात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही श्री शिंदे यांनी सांगितले.