राज्य स्पर्धेत पिंपरी-चिंचवड मुलींचा संघ तृतीय; सहा खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

- Advertisement -

राज्य स्पर्धेत पिंपरी-चिंचवड मुलींचा संघ तृतीय; सहा खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

भूषण गरुड
महाराष्ट्र राज्य टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशनद्वारा आयोजित राज्य अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत पिंपरी चिंचवड मुलींच्या संघाने अटीतटीची लढत देत तृतीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांकासाठी पिंपरी-चिंचवड मुलींचे संघाने धुळे जिल्हा, नागपूर जिल्हा याच्यावर विजय मिलवून तृतीय क्रमांकासाठी लढत देत नागपूर शहर संघावर विजय संपादन केला. राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुलीच्या संघातून अज्ञा पाटील (डी वाय), वैष्णवी जैस्वाल (डी वाय), शर्वरी स्वामी (डी वाय), भानवी कापले (नोवेल) व मुलांच्या संघातून अनुराग जगताप (विद्यांचाल), विरेंन चौधरी (सीएमएस), निखिल जाधव (बेथनी) या खेळाडूची निवड झाली आहे. 
मुलांचा संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत लढत दिली. राज्य अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचे आयोजन धुळे जिल्हा संघटनने दौडई येथे १३ ते १५ सप्टेंबर केले होते. महाराष्ट्रतील २२ जिल्ह्यातील १९ वर्षे मुले व मुली संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. पिंपरी-चिंचवड संघाकडून मुले व मुली दोन्ही संघ प्रशिक्षिका पार्वती बाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळले. संघातील खेळाडू  अमिषा पाटील (कर्णधार) हिच्या मार्गदर्शनखाली वैष्णवी जैस्वाल, साक्षी सरदार, भानवी कापले आणि आज्ञा पाटील ह्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. संचिता सोनवणे, वैष्णवी जैस्वाल, भानवी कापले, अमिषा पाटील चांगली गोलंदाजी केली आहे. श्रद्धा आव्हाड, मृणाली पानसरे आणि मधुरा बाफना ह्यांनी चांगले क्षेत्ररक्षण केले आहे. प्रशिक्षिका म्हणून पार्वती बाकळे यांनी व व्यवस्थापक म्हणून चिंतामणी चौधरी यांनी काम पाहिले.
पिंपरी-चिंचवड टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे सचिव प्राचार्या मृदुला महाजन व अध्यक्ष प्रा अनिल दाहोत्रेसह संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून राज्य स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल कौतुक केले.

- Advertisement -