Home मनोरंजन राज कुंद्राच्या कंपनीचा शिल्पा शेट्टीनं का दिला राजीनामा? सहा तास झाली चौकशी

राज कुंद्राच्या कंपनीचा शिल्पा शेट्टीनं का दिला राजीनामा? सहा तास झाली चौकशी

0
राज कुंद्राच्या कंपनीचा शिल्पा शेट्टीनं का दिला राजीनामा? सहा तास झाली चौकशी

[ad_1]

हायलाइट्स:

  • राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी पोलिसांच्या रडारवर
  • राज कुंद्राच्या कंपनीमध्ये डायरेक्टर पदावर कार्यरत होती शिल्पा शेट्टी
  • काही महिन्यांपूर्वीच शिल्पा शेट्टीनं दिला होता डायरेक्टर पदाचा राजीनामा

मुंबई: बिझनेसमन राज कुंद्राला काही दिवसांपूर्वीच पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली. त्यानंतर आता त्याची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा अनेक कंपन्यांमध्ये भागीदार होते. तसेच राज कुंद्राची कंपनी विआन इंडस्ट्रीजमध्ये शिल्पा डायरेक्टर पदावर कार्यरत होती. मात्र काही महिन्यांपूर्वीच तिनं या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता शिल्पा शेट्टीचाही हा प्रकरणात सहभाग होता का? किंवा तिला या कंपनीतून किती नफा झाला आहे? याचा पोलीस तपास करत आहेत.

Explainer- Erotic आणि Porn Film मध्ये काय फरक असतो, यातच अडकली आहे राज कुंद्राची Pornography Case

शुक्रवारी दुपारी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी तब्बल ६ तास शिल्पा शेट्टीची चौकशी करण्यात आली. राज कुंद्राच्या अटकेनंतर या संपूर्ण प्रकरणात शिल्पा शेट्टीचा किती सहभाग होता. तिला या सर्वाची कल्पना होती का? तसेच यातून तिला काही नफा झाला आहे का? याची चौकशी करत आहे. या प्रकरणाशी संबंधीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिल्पा शेट्टी राज कुंद्राच्या ‘विआन इंडस्ट्रीज’ कंपनीत डायरेक्टर पदावर कार्यरत होती पण काही महिन्यांपूर्वीच तिनं या पदाचा राजीनामा दिल्यानं तिच्यावर संशय व्यक्त केला जात आहे आणि त्या दृष्टीने पोलिस तपास सुरू आहे. पण तिने या पदाचा राजीनामा का दिला याचा खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही.

मीडिया रिपोर्टनुसार या संपूर्ण प्रकरणात आता शिल्पा शेट्टीला यातून काही फायदा झाला आहे की नाही हे तापसून पाहण्यासाठी क्राइम ब्रांच तिच्या बँक अकाउंट्सची देखील तपासणी करणार आहे. तसेच शिल्पानं विआन इंडस्ट्रीसाठी किती दिवस काम केलं हे देखील पाहिलं जाणार आहे. दरम्यान राज कुंद्राच्या या केसमध्ये शिल्पा शेट्टीला अद्याप कोणत्याही प्रकारची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेली नाही. त्यामुळे शिल्पा शेट्टीची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.

राज कुंद्रा कोट्यवधी रुपयांना विकणार होता १२१ पॉर्न व्हिडिओ, पोलीस तपासात समोर आलं सत्य

मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचनं या पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रासह इतर ११ जणांना अटक केली आहे. १९ जुलैला राज कुंद्राला अटक झाल्यानंतर त्याला २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यात आता वाढ झाली असून ही कोठडी आता २९ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

[ad_2]

Source link