‘हॉटशॉट्स’ला पर्याय म्हणून राज नवीन अॅप लॉन्च करणार होता.या नवीन अॅपवरील चित्रपटासाठी राजनं त्याची मेव्हणी शमिता शेट्टी तसंच मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या नावाचा विचार केला होता. असा दावा गहना वशिष्ठ हिनं नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. त्यामुळं एकंच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय म्हणाली गहना?
राज कुंद्राला अटक होण्याच्या काही दिवसांपूर्वीच आमची त्याच्या ऑफिसमध्ये भेट झाली होती. त्यावेळीच मला त्याच्या नवीन ‘बॉलिफेम‘ या अॅप बद्दल समजलं होतं. या अॅपवर चॅट शो तसंच रिअॅलिटी शो , फिचर फिल्म , म्युझिकल व्हिडिओंचा समावेश असणार होता. याबद्दल आमचं बोलणं झालं होतं. त्यात कोणताही अश्लील किंवा बोल्ड मजकूर नसणार होता. असंही गहनानं स्पष्ट केलं आहे. या अॅपसाठीच्या एका चित्रपटासाठी त्याची मेव्हणी शमिता शेट्टी तर आणखी एका चित्रपटासाठी सई ताम्हणकरला कास्ट करण्याचा विचार होता. असं गहना म्हणाली.