चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं यांच्याकडून अश्लिल व्हिडिओ करून घेतले जात होते. अनेक महिला अभिनेत्रींनी पोलिसांकडे मदत मागितल्याचं पोलिसांनी सांगितलं.
राज कुंद्राच्या कंपनीच्या संबंधीत जे अॅप्स ते समोर आले पॉर्नोग्राफी आणि अश्लिल कन्टेंटसंबंधीत आहेत. हे अॅप्स यापूर्वीच गुगल आणि अॅपलकडून बॅन करण्यात आले आहेत. राज कुंद्राच्या वियान कंपनीचं केनरीन नावाच्या कंपनीशी टायअप आहे. राज कुंद्राच्या बहिणीचे पतीया कंपनीचे मालक आहेत. या कंपनीचं हॉटशॉट्स नावाचं अॅप आहे. ही कंपनी लंडन स्थित असली तरी सर्व काम राज कुंद्राच्या मुंबईतील वियान कंपनीतून होत होती.
उमेश कामत इंडियन हेड
राज कुंद्राच्या मालकीच्या वियान नावाच्या कंपनीत उमेश कामत हा काम करत होता. त्याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तो इंडियन हेड म्हणून भारतात काम पाहात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.