हायलाइट्स:
- गहनापाठोपाठ सागरिका शोनानेही केले राज कुंद्रावर खळबळजनक आरोप
- राज कुंद्राने न्यूड ऑडिशन देण्याची केली होती मागणी
- पोर्नोग्राफी फिल्म प्रकरणी राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी केली आहे अटक
‘मी अॅप पाहिला, त्यात फार काही नव्हतं,’ राज कुंद्राच्या समर्थनात बोलला मिका सिंग
काय म्हणाली सागरिका
याचवर्षी फेब्रुवारीमध्ये सागरिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये सागरिकाने एक खळबळजनक आरोप केला होता. ती म्हणाली होती की, ‘ मी सागरिका सोना. मनोरंजन विश्वामध्ये एक मोठे पॉर्न सिनेमांचे रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटमध्ये अनेक मोठमोठ्या व्यक्तींचा सहभाग आहेत. लॉकडाउनच्या काळात म्हणजे ऑगस्ट २०२० मध्ये मला एका वेब सीरिजमध्ये काम करण्याची ऑफर आली होती.’
‘या सीरिजमध्ये काम करायला होकार दिल्यानंतर राज कुंद्राच्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामथने मला फोन केला. त्याने मला ऑनलाइन ऑडिशन घेणार असल्याचे सांगितले. त्यानुसार मला व्हिडीओ कॉल आला त्यात मी सहभागी झाले. या व्हिडीओ कॉलमध्ये तीन व्यक्ती होत्या. त्यातील एका व्यक्तीने त्याचा चेहरा झाकून घेतला होता. या तिघांमध्ये एक राज कुंद्रा होता. ही ऑडिशन सुरू असताना राज कुंद्राने माझ्याकडे न्यूड ऑडिशन देण्याची मागणी केली. त्याची ही मागणी ऐकून मला मोठा धक्का बसला. मी त्यांना स्पष्ट शब्दांत नकार देत कॉल बंद केला.’
राज कुंद्राची कंपनी कशी करत होती तरुणींची फसवणूक? पोलिसांचा खळबळजनक खुलासा
फेब्रुवारीतच उमेशला झाली अटक
दरम्यान, उमेश कामथला मुंबई पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी कथित पॉर्न रॅकेटप्रकरणी अटक केली होती. उमेश कामथने मोबाईल अॅप्लिकेशनवरून कमीत कमी आठ पॉर्न व्हिडीओ अपलोड केल्याचा त्याच्यावर आरोप होता.
गहना वशिष्टनेही केलाय राज कुंद्रावर आरोप
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या या अटक सत्रानंतर छोट्या पडद्यावरील अभिनेत्री गहना वशिष्ठने आपली प्रतिक्रिया देत आता खरा मास्टरमाइंड सगळ्यांसमोर येणार असल्याचे म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी गहनालादेखील अश्लील व्हिडीओ बनवल्याबद्दल पोलिसांनी अटक केली होती. गहनाने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘लवकरच सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. खरा मास्टरमाइंड कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे. हे आता ‘बिग बॉस’ च्या घराप्रमाणे वाटतंय किंवा टीव्हीवरील चोर- पोलिसांच्या मालिकेसारखं सुरू आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाच्या तळाशी जाण्याची गरज आहे. देशात शेकडो लोक अजूनही कित्येक व्हिडीओ तयार करून लाखोंची कमाई करत आहेत. खूप मोठमोठ्या व्यक्तींचा देखील या प्रकरणाशी संबंध आहे. परंतु, मला फक्त बळीचा बकरा बनवले गेले आहे.’