हायलाइट्स:
- राज कुंद्राच्या अटकेनंतर होत आहेत अनेक धक्कादायक खुलासे
- कंपनीच्या वेगवेगळ्या बँक अकाउंटमधून होत असे लाखोंची उलाढाल
- पोलीस चौकशीत राज कुंद्रानं सांगितलं या व्यवहारांचं सत्य
Raj Kundra Case: ‘देवा याला आयुष्यभर तुरुंगात सडव’, राज कुंद्रावर यूट्यूबरचा धक्कादायक आरोप
हॉटशॉट्स हे अॅप डेव्हलप केल्यानंतर हे अॅप केनरिंग नावाच्या एका कंपनीला २५ हजार डॉलरच्या किंमतीला विकल्याच पोलीस चौकशीत राज कुंद्रानं सांगितलं. पण या अॅपच्या मेनटेनन्ससाठी मात्र केनरिंग कंपनीचं राज कुंद्राच्या विआन कंपनीचं टाय-अप होतं त्यामुळेच या मेनटेनन्ससाठी लाखो रुपयांचा व्यवहार विआन कंपनीच्या १३ बँक अकाउंटमध्ये होत असे अशी माहिती राज कुंद्रानं दिली.
दरम्यान क्राइम ब्रांचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटशॉट्सच्या सब्सक्रायबर्सच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईचा पैसा हा मेनटेनन्सचा व्यवहार म्हणून दाखवणं ही Modus Operandy आहे. मेनटेनन्सच्या नावावर करोडो रुपयांचा व्यवहार युके बेस्ड केनरिंग कंपनी राज कुंद्राच्या कंपनीच्या १३ बँक अकाउंटमध्ये करत असे. त्यानंतर काही सेल कंपनीमध्ये हा पैसा पाठवला जात असे आणि नंतर तोच पैसा राज कुंद्राच्या पर्सनल बँक अकाउंटमध्ये जात असे.
पॉर्नोग्राफीसाठी राज कुंद्रानं आखला होता ‘प्लॅन बी’, चॅटमध्ये झाला धक्कादायक खुलासा
क्राइम ब्रांचनं राज कुंद्रा आणि त्याची कंपनी विआनशी संबंधीत सर्व बँक अकाउंटमध्ये मोठ्य़ा प्रमाणावर झालेल्या व्यवहाराबाबत फॉरेन्सिक ऑडिट करण्याची तयारी केली आहे. केनरिंग कंपनीचे सीईओ प्रदीप बख्शी यांना फरार आरोपी ठरवत त्यांच्यासाठी एलओसी लागू करण्यात आली आहे.