‘राज कौशल यांना श्रद्धांजली वाहते की मुलीचं प्रमोशन करतेय’, युझर्सनी महिमा चौधरीला केलं ट्रोल

‘राज कौशल यांना श्रद्धांजली वाहते की मुलीचं प्रमोशन करतेय’, युझर्सनी महिमा चौधरीला केलं ट्रोल
- Advertisement -


हायलाइट्स:

  • राज कौशल यांना हसऱ्या चेहऱ्याने श्रद्धांजली वाहिल्याने महिमा चौधरी ट्रोल
  • महिमा असंवेदनशील असल्याचा युझर्सनी केले आरोप
  • राज यांच्या अनेक आठवणींना महिमाने दिला उजाळा

मुंबई : निर्माता- दिग्दर्शक राज कौशल यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री मंदिरा बेदीला खूप मोठा धक्का बसला आहे. राज यांच्या अचानक मृत्यूमुळे बॉलिवूडवरही शोककळा पसरली आहे. राज यांच्या अंत्यसंस्कारावेळी बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रातील काही कलाकार उपस्थित होते. तर अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. काही कलाकारांनी मंदिराच्या घरी जाऊन तिचे सांत्वनही केले. राज यांच्या आठवणींना उजाळा देताना सारेजण खूपच भावुक झाले होते. मात्र महिमा चौधरीने राज यांना हसऱ्या चेहऱ्याने श्रद्धांजली दिल्याने तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

काय झाले नेमके

महिमा चौधरी आपल्या परिवारासोबत होती. तेव्हा फोटोग्राफर्सनी तिला राज कौशल यांच्या निधनाबद्दल काही प्रश्न विचारले. त्यावेळी महिमाने राज यांच्या काही आठवणींन उजाळा दिला. तिने सांगितले मुंबईत राज बाईकवर फिरायचे. त्यानंतर महिमाने तिच्या मोबाइलमधील राज कौशल यांचा लहानपणीचा फोटो दाखवत सांगितले की मंदिरा आणि त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी ती राज यांच्या घरी जाणार आहे.


या व्हिडिओमध्ये राज कौशल यांच्याविषयी बोलत असताना महिमा सतत हसत होती. तिचे हे असे वागणे अनेक युझर्सना खूप खटकले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर महिमाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका युझरने लिहिले, ‘कुणा व्यक्तीला श्रद्धांजली वाहताना दात काढून ही कशी हसू शकते. शोक संदेश वाहताना ती आपल्या मुलीचे प्रमोशनही करत आहे. खरेच किती विचित्र लोक असतात.’ आणखी एका युझरने लिहिले की, ‘ही दुःख व्यक्त करत आहे? वाटत तरी नाही… हसून फोटोग्राफरला पोज देत आहे.’ अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर युझर व्यक्त करत आहेत.

मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मंदिरा आणि राज यांच्या लग्नाला १२ वर्षे झाल्यानंतर वीरचा जन्म झाला. तर गेल्यावर्षी राज आणि मंदिराने ताराला दत्तक घेतले होते.





Source link

- Advertisement -