राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदुजननायक राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला आहे.राज ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर शरद पवार चांगलेच बरसले आहेत.राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्यात अर्थ नाही,असे पवारांनी म्हटले आहे.त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या आझाद मैदानावरील भाषणाला शरद पवार यांनी ‘निव्वळ करमणूक’ असल्याचे पवारांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचे सर्वत्र चर्चा होत आहेत.राजकारणात भूमिका बदलल्या की मित्र बदलतात, हे अनेकदा आपल्याला दिसून आलं आहे. राज्यातही लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक सर्वांनी पाहिली. मात्र महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं आणि दोन्ही नेत्यांमधील दुरावा वाढल्याचं समोर येत आहे. राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईत पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढला होता. या मोर्चावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटलं की, सगळ्या गोष्टींची फार गांभीर्याने दखल घेण्याची गरज नसते.एका अर्थाने शरद पवारांनी राज यांची खिल्ली उडवली आहे.
राज ठाकरे यांनी रविवारी मोर्चानंतर केलेल्या भाषणात घुसखोरांविरोधात बोलताना म्हटलं की, दगडाचं उत्तर दगडानं दिलं जाईल आणि तलवारीचं उत्तर तलवारीनं दिलं जाईल. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ठीक आहे, सगळ्या गोष्टींची फार गांभीर्याने नोंद घ्यायची गरज नसते. शेवटी राज्याच्या राजकारणावर ज्यांच्यामुळे परिणाम होऊ शकतो, अशांची दखल घ्यायची असते. काही नेत्यांची भाषणं ऐकायला लोक येत असतात, काहींची भाषणं बघायला येत असतात. अशी भाषणं ऐकायला येणाऱ्यांसाठी ती ‘एक करमणूक’ असते, असा टोला शरद पवारांनी लगावला.
























WhatsApp