राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा येथील रासेयो विभागाचा covid 19 मध्ये स्तुत्य उपक्रम

- Advertisement -

पारोळा : प्रतिनिधी

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे गरीब व मजूर लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही. म्हणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. हा दृष्टीकोन लक्षात घेऊन मुकटी गावाजवळील कासविहीर या गावातील अपंग, विधवा महिला व गरजू लोकांना राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा येथील रासेयो स्वयंसेवक चि. चंद्रकांत माधवराव पाटील (F. Y. B. Sc), मुकेश मैन, कु चेतना पिले, प्रा डॉ डी आर पाटील रासेयो कार्यक्रम अधिकारी, आणि गावकरी यांनी 80 कुटुंबाना प्रत्येकी दोन किलो तांदूळाची मदत केली. या सत्कार्याबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा माजी खासदार ऍड श्री वसंतरावजी मोरे, प्राचार्य श्री बी व्ही पाटील आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले।

- Advertisement -