हायलाइट्स:
- काही आठवड्यांपूर्वीच बलात्कार प्रकरणात पर्ल पुरीला पोलिसांनी केली होती अटक
- पर्ल वी पुरीनं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा करण्यात आला होता आरोप
- संपूर्ण प्रकरणावर अखेर पर्ल पुरी सोशल मीडियाच्या माध्यामातून सोडलं मौन
पर्ल वी पुरीनं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यानं आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यानं लिहिलं, ‘मागचे काही आठवडे माझ्यासाठी एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे होते. रात्रभरात मला गुन्हेगार ठरवण्यात आलं. मी गुन्हेगार असल्याची जाणीव करून देण्यात आली. हे सर्व झालं तेव्हा माझ्या आईवर कॅन्सरचे उपचार सुरू होते. त्यावेळी मला मी पूर्णपणे असहाय्य असल्याचं जाणवलं होतं. हा विचार केल्यानंतर आजही माझं डोकं सुन्न पडतं.’
पर्लनं पुढे लिहिलं, ‘पण मी विचार केला की, आता मला माझे मित्र, चाहते आणि हितचिंतकांशी बोलायला हवं. ज्यांनी मला एवढं प्रेम आणि पाठींबा दिला आहे. माझी काळजी केली आहे. माझ्यावर विश्वास ठेवला. या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद मी ‘सत्यमेव जयते’वर विश्वास ठेवतो आणि मला माझ्या देशाचा कायदा आणि देवावर पूर्ण विश्वास आहे.’
आपल्या पोस्टमध्ये पर्ल वी पुरी मागच्या काही दिवसांत त्याला कसा मानसिक त्रास झाला याबद्दल सांगितलं आहे. काही महिन्यांपूर्वीच पर्लच्या आजीचं निधन झालं होतं आणि त्यानंतर अवघ्या १७ दिवसांनी पर्लच्या वडिलांचंही निधन झालं. हे सगळं एवढ्यावरच थांबलं नाही. यानंतर काही दिवसांतच त्याच्या आईलाही कॅन्सरचं निदान झालं आणि त्याचवेळी पर्लवर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. ज्यामुळे त्याला तुरुंगात जावं लागलं होतं.