Home पोलीस घडामोडी रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवून लुटणारा जेरबंद, अल्पवयीन मुलगा ताब्यात

रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवून लुटणारा जेरबंद, अल्पवयीन मुलगा ताब्यात

0

रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवून लुटणारा जेरबंद, अल्पवयीन मुलगा ताब्यात

अहमदनगर : रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार शेतकºयांना शस्त्रांचा धाक दाखवून लुटणाºयाला अटक करण्यात आली तर एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले. या आरोपींनी बंदूक व चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारांना लुटले होते. कारवाईदरम्यान आरोपींकडून चोरलेला मोबाईल, एअर गन, गुन्ह्यात वापरलेली विना नंबरची दुचाकी जप्त करण्यात आल्याचे अहमदनगर गुन्हे शाखेच्या पथकाने दिली.
अंगद फुंदे (२४) हे मित्र वैष्णव फुंदे याच्यासोबत दुचाकीवरून पाथर्डीला जात होते. प्फुंदे टाकळी गावाच्या पुढे येताच पाठीमागून एका दुचाकीवर दोन इसम आले. त्यांनी अंगद याची दुचाकी अडवली. अंगद व वैष्णव यांना बंदूक व चाकूचा धाक दाखवून धमकावले. त्यांच्याकडील मोबाईल, सोन्याची चेन, ५ हजार रुपयांची रोकड असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून पळ काढला. या प्रकरणी अंगद याने पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली. शस्त्राच्या धाकावर लुटल्या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध (गु.र.क्र. ३३२/२०२०) भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ नुसार गुन्हा दाखल केला.


या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पाथर्डी पोलीस करू लागले. तपासादरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना आरोपीची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मच्छिंद्र ऊर्फ बच्चन श्रीमं्रत वारे (२४) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याीच कबुली दिली. तसेच गुन्ह्यात सहभागी असलेल्या अल्पवयीन साथीदाराची माहिती दिली. पोलिसांनी अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेला मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली विना नंबरची दुचाकी, एअर गन असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार, अपर पोलीस आयुक्त डॉ. सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नानेकर, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, पोलीस नाईक सचिन आडबल, पोलीस नाईक धुळे, पोलीस शिपाई राहुल सोळुंके, पोलीस शिपाई रवींद्र घुंगासे, पोलीस शिपाई रोहिदास नवगिरे, पोलीस शिपाई विनोद मासाळकर, पोलीस शिपाई मेघराज कोल्हे, पोलीस शिपाई दीपक शिंदे आदी पथकाने केली.