Home शहरे औरंगाबाद रात्री ऱिक्षाचा प्रवास करताय सावधान,सीसीटीव्हीत भयानक दृष्य कैद

रात्री ऱिक्षाचा प्रवास करताय सावधान,सीसीटीव्हीत भयानक दृष्य कैद

0

औरंगाबाद: सीसीटीव्हीत भयानक दृष्य कैद झाली आहेत, या माणसाच्या अंगावर रिक्षा टाकत त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न होतोय, आणि हा प्रकार सुरु आहे, तो फक्त या माणसाला लुटण्यासाठी, औरंगाबादच्या विद्यानगर भागात राहणारे हे गिरीश गोळेगावकर, 27 तारखेला रात्री ते 12.30 च्या दरम्यान सेव्हन हिल भागातून रिक्षात बसले, त्या रिक्षात आधीच तीन जन होते, रिक्षा विद्या नगर जवळ आला गिरीश उतरले आणि घऱी जायला लागले. मात्र, रिक्षा चालक मागून आला आणि त्यांच्या अंगावर रिक्षा टाकण्याचा प्रयत्न केला. रिक्षातून एकजन गिरीश यांच्या मागे सुद्धा धावला त्यात गिरीश पडले, त्यांना थोड़ी मारहाण झाली. मात्र, कसाबसा त्यांनी पळ काढला, लुटण्याच्या उद्देशानं या रिक्षाचालकांनी हा प्रकार केला.

हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांनी आता रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. झालेला हा प्रकार धक्कादाक आहे, रात्रीतून घरी जायला रिक्षा हेच अनेकांपुढं एकमेव साधन आहे. मात्र, या रिक्षाचालकांच्या माध्यमातून अशी लूट होत असेल तर हा प्रकार गंभीर आहे. पोलिसांनी तातडीनं अशा गुन्हेगारी वृतीच्या रिक्षाचालकांना शोधून त्यांच्यावर कारवाई कऱण्याची गरज आहे