Home शहरे कोल्हापूर राधानगरी तालुक्यात अपघातामध्ये चार जण ठार; तीनजण गंभीर जखमी

राधानगरी तालुक्यात अपघातामध्ये चार जण ठार; तीनजण गंभीर जखमी

कोल्हापूर : घोटवडे (ता. राधानगरी) येथे स्वयंभू मंदिराच्यानजीक महामार्गावर डंपर व जीपची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तर जीपमध्ये एकूण 16 प्रवासी होते. त्यातील 12 जण जखमी असून त्यातील तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. नातेवाईकांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली आहे. गोकुळचे संचालक अरुण डोंगळे व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सीपीआरमध्ये जखमींची विचारपूस केली.

रम्यान घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की प्रवासी जीप राधानगरी येथून कोल्हापूर एमआयडीसीकडे येत होती. या जीपमध्ये एमआयडीसीमधील कारखान्यामध्ये काम करणारे कर्मचारी होते अशी प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच राधानगरी पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तसेच इस्पुलीँ, राशिवडे व राधानगरी येथील ॲम्बुलन्स घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. जखमींना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.