हायलाइट्स:
- ट्रेलरला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर ‘राधे’ गाणं चर्चेत
- ‘दिल दे दिया’ आणि ‘सीटी मार’ ने देखील जिंकली होती प्रेक्षकांची मनं
- टायटल ट्रॅकमध्ये सलमान दिसतोय हटके लुकमध्ये
करोना- वडिलांचं छत्र हरवलेल्या मुलाला सलमानची लाखमोलाची मदत
सलमानच्या इतर गाण्यांपेक्षा हटके असणाऱ्या या गाण्यात सलमान दाढीमध्ये दिसत आहे. सलमानच्या या लुकने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. तर नेहमीप्रमाणे दिशा पाटनी तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजात दिसत आहे. ‘राधे’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक साजिद यांनी लिहिलं असून त्यांनीच हे गाणं गायलं देखील आहे. तर साजिद- वाजिद यांनी गाण्याला संगीत दिल आहे. यापूर्वी चित्रपटातील ‘सीटी मार’ आणि ‘दिल दे दिया’ ही गाणी देखील प्रेक्षकांच्या भेटीला अली होती.
‘राधे: युअर मोस्ट वॉण्टेड भाई’ चित्रपट प्रभुदेवा यांनी दिग्दर्शित केला असून सलमान आणि दिशा सोबत रणदीप हुडादेखील चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. रणदीप चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहे. याशिवाय अभिनेते जॅकी श्रॉफ यांचीही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सिद्धार्थ जाधव आणि प्रवीण तरडे यांसारखे मराठी कलाकारदेखील चित्रपटात त्यांच्या अभिनयाची छाप पाडताना दिसणार आहेत.
अली गोनीचं कुटुंब करोना पॉझिटिव्ह; लहान भाच्यांनाही झाली लागण