Home मनोरंजन ‘रामयुग’वर कुणाल कोहली यांची प्रतिक्रिया, म्हणे ‘खूप मॉडर्न असणार आहे वेब सीरिज’

‘रामयुग’वर कुणाल कोहली यांची प्रतिक्रिया, म्हणे ‘खूप मॉडर्न असणार आहे वेब सीरिज’

0
‘रामयुग’वर कुणाल कोहली यांची प्रतिक्रिया, म्हणे ‘खूप मॉडर्न असणार आहे वेब सीरिज’

[ad_1]

मुंबई: ‘फना’, ‘हम तुम’ आणि ‘मुझसे दोस्ती करोगे’ यांसारखे हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक आणि निर्माता कुणाल कोहली आता मायथॉलॉजीमध्ये आपलं कौशल्य दाखवताना दिसणार आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कुणाल कोहली यांनी त्याच्या नवा वेब शो ‘रामयुग‘बद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यांची ही नवी मॉडर्न कथा कशी असणार आहे याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.

‘तो माझ्यासाठी योग्य नव्हता’ ब्रेकअपनंतर महकनं व्यक्त केल्या भावना

दिग्दर्शक कुणाल कोहलीने एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आगामी वेब सीरिजबद्दल गप्पा मारल्या. ते म्हणाले, आम्हाला प्रेक्षकांच्या एवढ्या प्रतिक्रियांची अपेक्षा नव्हत्या. पण ट्रेलर रिलीज नंतर प्रेक्षकांच्या या प्रतिक्रियांना आम्हाला आत्मविश्वास मिळाला. ही कथा तशीच आहे जशी रामायणाची कथा आहे. पण आधुनिक टेक्नॉलॉजीचा आम्ही चांगला उपयोग केला आहे. तुम्ही पाहिलं असेल की, रामानंद सागर यांच्या रामायणात आपण रथ उडताना पाहिले होते. आम्ही त्यााला आणखी खरे वाटावे यासाठी मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. ज्यामुळे ते आणखी खरेखुरे असल्यासारखे दिसत आहेत. आम्ही फक्त या वेब सीरिजमधून रामायण मॉडर्न पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही एक मॉडर्न कथा आहे.


कुणाल कोहली पुढे म्हणाले, ‘जसं मी म्हटलं आमच्या रामायणात अभिनेता कबीर दुहान सिंह रावणाची भूमिका साकारत आहे. रामायणात रावणाची दहा तोंडं तर दाखवण्यात आली आहेत पण बोलताना मात्र त्याचं एकच तोडं बोलताना दिसतं. पण रामयुगमध्ये मात्र दहाही तोंडं लाइव्ह अॅक्शनमध्ये दिसणार आहे. काही रागीट तर काही आळशी तर काही मजेदार रावणाचे अनेक मूड दाखवण्यात आले आहेत.’

‘दृश्यम २’ चित्रीकरणाआधीच अडचणीत, निर्मात्यांवर खटला दाखल


या मुलाखतीत कुणाल कोहली यांनी सांगितलं, ‘कोणतीही भूमिका एकमेकांवर भारी पडू नये असा माझा विचार होता. प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळावं आणि सर्वाच महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वेब सीरिजमध्ये आम्ही नव्या कलाकारांसोबत काम करत आहोत. आम्ही सुरुवातीलाच ठरवलं होतं की आम्हाला नव्या टॅलेंडेट लोकांसोबत काम करायचं आहे. त्यामुळे या वेब सीरिजमध्ये खूप मॉडर्न असणार आहे.’



[ad_2]

Source link