Home ताज्या बातम्या राष्ट्रपतींनीही दिली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला साद

राष्ट्रपतींनीही दिली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला साद

नवी दिल्ली : रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल बॅटरी सुरू करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संपूर्ण देशाला केलं होतं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनााला साद देत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही राष्ट्रपती भवनात दिवे पेटवले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही होत्या.मोदींच्या या आवाहनाला रविवारी रात्री 9 वाजता देशवासीयांना उत्तम प्रतिसाद दिला. घराघरात दिवे पेटले होते. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्स सुरू केलं होतं.करोना व्हायरसच्या विरोधात देश एकवटला आहे. देशातील कलाकार, व्यावसायिक आणि नागरिकांनी मेनबत्ती, दिवे लावून मोदींच्या आवाहनाला पाठींबा दिला आहे. यावेळी अनेक ठिकाणी गो करोना गो च्या घोषणा देण्यात आल्या.