राष्ट्रपती भवनातील एका व्यक्तीला करोनाची बाधा

- Advertisement -

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील एका व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. त्यानंतर 125 जणांना स्वयंविलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली.सोमावरच्या डाटानुसार 2081 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर राष्ट्रपती भवनातील एकाची चाचणी मंगळवारी पॉझिटिव्ह आली आहे. रॅपीड टेस्टिंग किटद्वारे नबी करीम भागातील 74 जणांची चाचणी घेण्यात आली ती निगेटिव्ह आली आहे. करोना विषाणूंचे बाधित अद्याप सापडत असल्याने गझीयाबाद दिल्ली रस्ता बंद ठेवण्याचे त्यांनी समर्थन केले.

- Advertisement -