मुंबई, दि. 13 : भारताचे मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीनंतर आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने हैद्राबादकडे प्रयाण झाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
000
- Advertisement -