Home बातम्या महत्वाच्या बातम्या “राष्ट्रीय एकता दौड 2019”

“राष्ट्रीय एकता दौड 2019”

0

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने सर्व भारतभर राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय एकता दिवस हा राष्ट्रीय एकता, अखंडता व राष्ट्राची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी साजरा केला जातो. नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना जोपासण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या वतिने दिनांक 31/10/2019 रोजी सकाळी 07.00 वा. क्रीडा भुवन अलिबाग बीच येथून 5 किलोमीटरची राष्ट्रीय एकता दौड आयोजित केली आहे. सदर एकता दौडमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा गट व खुला गट अशा प्रकारे गट तयार करण्यात येणार असून प्रत्येक गटात प्रथम 3 विजेत्यांना मा.पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. तसेच सदर एकता दौड कार्यक्रमाच्या ठिकाणी जे 500 स्पर्धक प्रथम हजर राहतील त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालया कडून टी-शर्ट देण्यात  येणार आहे. 

तरी पोलीस विभागातर्फे असे आवाहन करण्यात येत आहे कि, अलिबाग मधील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी तसेच रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी व स्पर्धकांनी यात सहभागी होऊन                           राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश” द्यावा.

       सदर एकता दौडच्या निमित्ताने पोलीस विभाग, सर्व अतिथी/मान्यवर व स्पर्धकांच्या उपस्थितीत स्पर्धेच्या सुरवातीस राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन राष्ट्रीय अखंडता राखण्याचा संकल्प करणार आहोत. या एकता दौड मध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्या स्पर्धकांनी नाव नोंदणी करिता पोलीस निरीक्षक श्री. संजय साबळे मो.नं. 8275693023, 9822777652 (कल्याण शाखा) यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी.