Home शहरे नागपूर राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत नागपूरची आर्या कळमकर प्रथम

राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत नागपूरची आर्या कळमकर प्रथम

नागपूर: विशाखापट्टनम येथे झालेल्या अ.भा. नृत्य स्पर्धेत नागपूरच्या आर्या कळमकर हिने शास्त्रीय नृत्य प्रकारात प्रथम तर उपशास्त्रीय प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
अजनी येथील माऊंट कार्मेल शाळेत ८ वर्गात आर्या शिकत आहे. या स्पर्धेत देशातल्या विविध राज्यांतून आलेल्या स्पर्धकांमधून तिची निवड करण्यात आली आहे. पारितोषिक वितरण प्रसंगी नाट्यावली नृत्य अकादमीचे संस्थापक व दिग्दर्शक यु. महेशबाबू यांच्यासह अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. आर्याने नागपुरातील प्रतिभा नृत्य मंदिर येथे आपले नृत्य प्रशिक्षण घेत आहे.