मुंबई, दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य” ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरु केली आहे. ही स्पर्धासाठी खुली असल्याने मुंबई शहरातील जास्तीत जास्ती नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.
यात प्रश्नमंजूषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा आणि भिति्तचित्र स्पर्धा अशा एकूण पाच स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी दि. 15 मार्च पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच स्पर्धेचे नियम, अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ ला भेट द्यावी. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्याचप्रमाणे स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी सर्व प्रवेशिका दिनांक 15 मार्च 2022 पर्यंत [email protected] या ईमेलवर पाठवाव्यात तसेच ईमेल करताना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा, असे भारत निवडणूक आयोगाने कळविल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.निवतकर यांनी दिली आहे.
000