Home गुन्हा राष्ट्रीय महामार्गावर भरदिवसा बर्निंग ट्रक चा थरार…….

राष्ट्रीय महामार्गावर भरदिवसा बर्निंग ट्रक चा थरार…….

0

एरंडोल- येथे शनिवारी सकाळी११.०० वा. सुमारास पिंपळकोठा गावानजी GVCक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर चालत्या आयशर ट्रक ला अचानक आग लागली. यात गाठीचे गठ्ठे, शेतात फवारणीचे स्प्रे, कीटकनाशके, प्लास्टिक परचूटन माल सुमारे २ ते २.५ लाखाचा माल जळून खाक झाला विशेष हे की, आग लागलेल्या ट्रकला पिंपळकोठा येथील गावकऱ्यांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला असता आगीवर नियंत्रण होऊ शकले नाही. म्हणून गावकऱ्यांच्या सूचनेवरून गावापासून थोड्या अंतरावरील वॉशिंग सेंटर वर पेटलेल्या अवस्थेत ट्रक वेगात नेण्यात आला. त्याठिकाणी प्रयत्न केल्यावर थोड्या वेळानंतर आगीवर नियंत्रण करण्यात आले.


एरंडोल पो. स्टे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की एम एच २० एटी ९१२१ क्रमांकाचा आयशर ट्रक आरको कंपनीचा परचूटन माल भरून निघाला सदर माल हा पाळधी व जळगाव येथे आरको कंपनीच्या ट्रान्सपोर्ट मध्ये खाली करायचा होता. सदर ट्रक २४ जानेवारी रोजी रात्री १०.०० वा. नाशिक येथून निघाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पिंपळकोठा गावानजीक या ट्रकला मागच्या भागाला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात आल्यावर ट्रक चालक असलम हा खाली उतरला व त्याने पाहिले की प्लास्टिकचे ग्लास जळत होते. त्याठिकाणी गावातील लोक धावत आले . व त्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचे प्रयत्न केले. परंतु करण्यात आगीवर नियंत्रण करण्यात अपयश आल्यामुळे ग्रामस्थांच्या सूचनेवरून चालकाने ट्रक तशा अवस्थेत वाशिंग सेंटर वर वेगात नेला. सदर बर्निंग ट्रक चा थरार पाहून महामार्गावरील ये-जा करणारे वाहनाचे चालक व प्रवासी यांच्यात खळबळ माजली. वाशिंग सेंटरवर गाडीवरील फट काढून गाडीतील माल तपासला असता शेतातील फवारणीचे स्प्रे, कीटकनाशक,१० लि. मापाचे, चार ते पाच कापडाचे गठ्ठे व इतर प्लास्टिक पर चूटन माल आगीत भस्मसात झाल्यामुळे अदमासे २ ते २.५ लाखाचे नुकसान झाले. आग विझवल्यानंतर ट्रक चालकाने दूरध्वनीवरून मॅनेजरला सदर घटनेची माहिती दिली तसेच एरंडोल पोलिसांनाही घटनेची खबर देण्यात आली. एरंडोल पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत एरंडोल पो. नि. स्वप्नील उनवण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौ. प्रदीप चांदेलकर व पोलीस कॉन्स्टेबल अमित तडवी तपास करीत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे ट्रक मधील लोखंडी मालाचे घर्षण होऊन ठिणगी पडल्याने प्लास्टिक माल व कपडा मालाला आग लागली असावी असा कयास ट्रकचालकाने एरंडोल पो. स्टे. ला दिलेल्या खबरीत नमूद केला आहे.