हायलाइट्स:
- राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या घरी लगीन घाई
- संगीत कार्यक्रमासाठी दोघेजण घेत आहेत मेहनत
- करोनामुळे लग्नामध्ये केवळ ५० जणांच केलेय निमंत्रीत
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राहुल आणि दिशा एकत्रितपणे डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या कपल डान्ससोबत त्यांचा सोलो डान्स देखील होणार आहे. विशेष म्हणजे या दोघांना वेडिंग कोरिओग्राफर सुमित खेतान ट्रेनिंग देत आहेत.
अली गोनी, मिका सिंह ही गाणार
राहुल वैद्यने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, त्याच्या संगीत कार्यक्रमामध्ये अली गोनी आणि मीका सिंह गाणे गाणार आहेत. लग्नाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे, तसा तो नर्व्हस होत असल्याचेही राहुलने त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.
लग्नामध्ये मोजक्या लोकांनाच निमंत्रण
राहुलने या मुलाखतीमध्ये हे देखील सांगितले होते की, करोनाच्या पार्श्वभूमीवर आमच्या लग्नाला जास्त लोकांना आमंत्रित केलेल नाही. करोना नियमांनुसार केवळ ५० जणांचा आमंत्रित करण्याची परवानगी आहे. त्यामुळे लग्नात अगदी जवळचे आणि खास मित्रमंडळींनाच बोलवण्यात आले आहे. दरम्यान, राहुल वैद्य लवकरच ‘खतरों के खिलाडी ११ ‘मध्ये दिसणार आहे.