Home गुन्हा रिक्षाचालक चालवत होता वेश्याव्यवसाय; इंटरनेटचा गैरवापर करून सुरु होता गोरखधंदा

रिक्षाचालक चालवत होता वेश्याव्यवसाय; इंटरनेटचा गैरवापर करून सुरु होता गोरखधंदा

0

मुंबई : इंटरनेटचा गैरवापर करून ‘Massage Republican.Com’ या साईटवर स्वतःचा मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करून त्याद्वारे काही आरोपींची टोळी भारतीय महिलांचा वापर करून देहविक्रीचा गोरखधंदा चालवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे कक्ष – १चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे बोगस ग्राहक पाठवून पोलिसांना छापा टाकला आणि २ मुलींची सुटका केली.

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी माहितीची शहनिशा करण्यासाठी ‘Massage Republican.Com’ या साईटवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर १० फेब्रुवारीला बोगस ग्राहक पाठवले असता मोबाइलधारकाने त्याला साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुरी मशिदीजवळील हॉटेल स्काय वे इन येथे बोलावले. त्यानुसार कक्ष – १० च्या पोलिसांनी नियोजनबद्ध छाप्याची तयारी केली. नंतर बोगस ग्राहकाला पाठवून हॉटेल स्काय वे इन येथे पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी दोन बळीत  मुलींसह एक इसम आढळून आला. एका मुलीचे वय ३० तर दुसऱ्या मुलीचे वय २१ असं आहे.  अधिक चौकशी केली असता तो इसम उच्चभ्रू भारतीय आणि विदेशी ग्राहकांना वेश्यागमनासाठी प्रलोभन देऊन आकर्षित करत असल्याचे उघड झाले. या अटक इसमाचे नाव जातुन महादेव यादव (३७) असं असून तो अंधेरी पूर्वेकडील चानक कॉलनीत राहतो. महत्वाचे म्हणजे तो रिक्षाचालक आहे.