रिलायंस इंडस्ट्रिज लिमिडेच्या कंपनीच्या वतीने सोमवारी (ता.12) 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येणार आहे. सभेत कंपनी कमर्शियल जियो गीगाफायबर रोलआउट आणि नेक्स्ट जनरेशन जियो फोन सादरीकरणाबाबत माहिती देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा जियोफोन ‘जियोफोन 3’ या नावाने सादर करण्यात येऊ शकतो. मात्र त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. मागील दोन वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीने जियोफोनचे दोन मॉडेल बाजारात आणले आहेत. या पार्श्वभूमीवर यावेळीही नवा जियो फोन लॉंच करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मागील वर्षी झालेल्या सभेत रिलायंस जियोने अधिकृतपणे जियो गीगाफायबरची घोषणा केली होती. मात्र अद्याप तरी हे ब्रॉडबॅंड नेटवर्क व्यावसायिकरित्या बाजारात उतरविण्यात आलेले नाही. जियोतर्फे काही निवडक शहरांमध्ये हळुहळु याचा विस्तार करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या सभेत कंपनी मासिक प्लॅन, किंमत आणि ऑफर्स बाबतीत सविस्तर माहिती देऊ शकते. सध्या काही ग्राहकांना प्राथमिक स्तरावर ही सेवा देण्यात आली आहे. ही सेवा ग्राहकांकडडून 4500 ते 2500 रुपयांपर्यंत सुरक्षा ठेव घेण्यात आली आहे. मुदत संपल्यानंतर ती ग्राहकांना परत करण्यात येणार आहे.
जुन्या अहवालांनुसार जियोमार्फत 600 रुपयांत मासिक कॉम्बो प्लॅन देण्यात येऊ शकतो. ज्यात ब्रॉडबॅंड, लॅंडलाईन आणि आयपीटिव्ही सेवा देण्यात येऊ शकते. मिळालेल्या दुसऱ्या एका अहलानुसार गीगाफायबरसाठी तीन प्लॅन्स् असतील. यात बेस प्लॅनमध्ये 100mbps कनेक्टिव्हीटी, दुसऱ्या प्लॅनमध्ये आयपीटिव्ही सेवा आणि स्मार्ट होम सेवा तर तिसऱ्या प्लॅनमध्ये ब्रॉडबॅंड एक्सेस, आयपीटिव्ही सेवा, आणि स्मार्ट होम सेवा असतील. याची किंमत पाचशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत असू शकते.