हायलाइट्स:
- फरहान अख्तरची मुख्य भूमिका असेलला ‘तूफान’ चित्रपट लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
- रिलीज होण्याआधीच ‘तूफान’ चित्रपट सापडला आहे वादाच्या भोवऱ्यात
- सोशल मीडियावर होतेय ‘तूफान’ला बॉयकॉट करण्याची मागणी
सोशल मीडियावर काही लोकांचं म्हणणं आहे की, फरहान अख्तरचा ‘तूफान’ चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे अनेकांनी या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर सध्या #BoycottToofan ट्रेंड होताना दिसत आहे. अनेकांनी हा हॅशटॅग वापरून ‘तूफान’ चित्रपटाच्या विरोधात ट्वीट्स करताना दिसत आहेत.
‘तूफान’ चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर बॉक्सर अजजी अलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री मृणाल ठाकूर डॉक्टर अनन्याची भूमिका साकारत आहे. तसेच अभिनेता परेश रावल बॉक्सिंग कोच नाना प्रभू यांच्या भूमिकात दिसणार आहेत. या व्यतिरिक्त या चित्रपटात सुप्रिया पाठक, हुसैन दलाल, मोहन अगाशे आणि दर्शन कुमार यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट येत्या १६ जुलैला अमेझॉन प्राइमवर रिलीज होत आहे.