Home ताज्या बातम्या रुग्णसंख्या घसरणीचा ट्रेंड बदलला; आज राज्यात १२ हजारांहून अधिक नवे करोना रुग्ण

रुग्णसंख्या घसरणीचा ट्रेंड बदलला; आज राज्यात १२ हजारांहून अधिक नवे करोना रुग्ण

0
रुग्णसंख्या घसरणीचा ट्रेंड बदलला; आज राज्यात १२ हजारांहून अधिक नवे करोना रुग्ण

हायलाइट्स:

  • महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा
  • रुग्णसंख्या घसरणीचा ट्रेंड बदलला
  • राज्यात आज १२ हजार २०७ नवे रुग्ण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णसंख्येचा आलेख घसरणीला लागल्याचं पाहायला मिळालं. मात्र हा ट्रेंड आज बदलला असून राज्यात मागील २४ तासांत १२ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद (Maharashtra Corona Cases Today) झाली आहे. राज्यात आज १२ हजार २०७ नवे रुग्ण आढळले असून करोनामुळे ३९३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच आज ११ हजार ४४९ करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले.

मागील आठवड्याभरात दिवसागणिक करोना रुग्णांची संख्या १० हजारांच्या आसपास आढळत होती. मात्र आज या आकड्यात वाढ झाली आहे. अनलॉक प्रक्रियेनंतर सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा तर हा परिणाम नाही ना, अशी शंका आता निर्माण झाली आहे.

अजित पवारांच्या ‘त्या’ घोषणेची अंमलबजावणी होणार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

राज्यात काय आहे करोनाची स्थिती?

राज्यात सध्या १ लाख ६० हजार ६९३ सक्रिय रुग्ण आहेत, तर आजपर्यंत ५८ लाख ७६ हजार ८७ नागरिकांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यातील ५६ लाख ८ हजार ७५३ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मात्र १ लाख ३ हजार ७४८ जणांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

कोणत्या शहरात किती सक्रिय रुग्ण?

ताज्या आकडेवारीनुसार मुंबईत १८ हजार १५७, ठाण्यात १५ हजार ९७५, रायगडमध्ये ४ हजार ८४२, रत्नागिरीत ६ हजार ६०९, सिंधुदुर्गात ५ हजार ९१०, पुण्यात १९ हजार ५२१, साताऱ्यात १० हजार ६३४, सांगलीत १० हजार ०७०, कोल्हापूरमध्ये १७ हजार ३७०, नागपूरमध्ये ७ हजार १६८, सोलापुरात ४ हजार ३८५, नाशिक ६ हजार २९४, अहमदनगर ४ हजार ९५५, जळगाव २ हजार ९१० आणि बीडमध्ये ३ हजार ४२७ करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या जिल्ह्यांच्या तुलनेत इतर काही जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिसत आहे. उर्वरित जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत.

Maratha Reservation मराठा आरक्षण: काँग्रेसच्या हेतुविषयी ‘या’ नेत्याच्या मनात शंका

अनलॉक प्रक्रिया आणि करोनाचे नियम

राज्य अनलॉक करताना सरकारने ५ पातळ्या तयार केल्या. जिल्ह्यांतील करोना प्रादुर्भाव स्थितीवरून निर्बंध किती प्रमाणात शिथिल करायचे, याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. मात्र असं असलं तरीही बाजारपेठांमध्ये आता पुन्हा एकदा गर्दी वाढू लागली आहे. तसंच काही नागरिकांकडून बेजबाबदारपणाही होत आहे. करोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन, मास्क-सॅनिटायजरचा वापर होत नसल्याचं पाहायला मिळतं. राज्यात आज वाढलेली रुग्णंसख्या हा त्याचाच परिणाम असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पहिल्या लाटेनंतर राज्यात करण्यात आलेल्या अनलॉक प्रक्रियेनंतर नागरिकांकडून नियमांचं उल्लंघन झालं होतं. त्यामुळे राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला. आता दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा आधीसारखीच स्थिती बाजारपेठांमध्ये निर्माण झाली तर तिसऱ्या लाटेतही राज्याला मोठा फटका सहन करावा लागू शकतो. त्यामुळे शासन-प्रशासनाने सतर्कता बाळगत नागरिकांकडून करोना नियमांचं उल्लंघन होणार नाही, यासाठी आणखी काळजी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Source link