Home बातम्या राष्ट्रीय रुग्णांचे 12 हजार कोटी वाचले – डी व्ही. सदानंद गौडा

रुग्णांचे 12 हजार कोटी वाचले – डी व्ही. सदानंद गौडा

नवी दिल्ली :केंद्र सरकारने आवश्‍यक औषधाच्या किमती नियंत्रित केल्यामुळे रुग्णांचा औषध उपचारावरील खर्च 12 हजार कोटी रुपयांनी कमी झाला असल्याची माहिती लोकसभेत केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी व्ही. सदानंद गौडा यांनी दिली.

ते म्हणाले की केंद्र सरकारने राष्ट्रीय औषधी दर प्राधिकरण तयार केल्यापासून विविध औषधांच्या किमती बऱ्याच नियंत्रणात आल्या आहेत. आगामी काळातही औषधांच्या किमतीवर सरकारचे लक्ष राहणार आहे.