Home शहरे मुंबई रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयाची तोडफोड; गुन्हा दाखल

रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयाची तोडफोड; गुन्हा दाखल

0
रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयाची तोडफोड; गुन्हा दाखल

[ad_1]

म. टा. वृत्तसेवा,
पनवेलमधील पटेल रुग्णालयामध्ये स्रीरोगाविषयक उपचारासाठी दाखल झालेल्या अश्विनी थवई (३६) या महिला वकिलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मात्र अश्विनीवर डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे अश्विनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत तिच्या नातेवाईकांनी पटेल रुग्णालयामध्ये घुसून तोडफोड केली.

पनवेलमध्ये राहाणाऱ्या अश्विनी थवई या व्यवसायाने वकील असून त्या पनवेलमधील पटेल रुग्णालयामध्ये स्त्रीरोगविषयक उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. रविवारी सायंकाळी त्यांच्यावर शस्रक्रिया केली जात असताना, त्या अचानक अत्यवस्थ झाल्याने पटेल रुग्णालयामधील डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास त्यांच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानुसार नातेवाईकांनी अश्विनी यांना पनवेलमधील गांधी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र त्याठिकाणी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. तर, ‘अश्विनीवर पटेल रुग्णालयामध्ये शस्रक्रिया केली जात असताना, त्यांना जास्त प्रमाणात भूल देण्यात आली होती, यावेळी जास्त रक्तस्राव झाल्यामुळे अश्विनी अत्यवस्थ झाल्यानंतर रुग्णालयामधील डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना कळविले,’ असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पटेल रुग्णालयामध्ये अश्विनी यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांच्या नातेवाईकांनी रविवारी सायंकाळी पटेल रुग्णालयामध्ये घुसून तोडफोड केली. या घटनेनंतर पटेल रुग्णालय व्यवस्थापनाने तोडफोड करणाऱ्यांविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. पनवेल शहर पोलिसांनी अश्विनीच्या मृत्यूनंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

[ad_2]

Source link