Home ताज्या बातम्या रेल्वेची साफसफाई करतांना एके 47 रायफलची 7 जीवंत काडतुसे व 4 बुलेट्स सापडल्या

रेल्वेची साफसफाई करतांना एके 47 रायफलची 7 जीवंत काडतुसे व 4 बुलेट्स सापडल्या

0

पुणे. आझाद हिंद एक्सप्रेसच्या बोगीतील स्वच्छतागृहात एके- 47 रायफलची 7 जीवंत काडतुसे आणि 4 बुलेट्स सापडल्याने एकच खळबळ उडाली.  पुणे स्टेशन परिसरातील घोरपडी यार्ड येथे रेल्वेची साफसफाई करीत असताना हा प्रकार उघडकीस आला.

SHIFA MOBILE : 9028293338

कोलकाता ते पुणे स्टेशन या दरम्यान आझाद हिंद एक्सप्रेस धावते. कोलकाता येथून आलेली आझाद हिंद एक्सप्रेस घोरपडी यार्ड येथे साफसफाईसाठी लावण्यात आली होती. यावेळी बोगी क्र. एस 2 मधील स्वच्छतागृहाच्या डस्टबीनमध्ये एके 47 रायफलचे 7 जीवंत काडतुसे आणि इतर 4 बुलेटस कर्मचाऱयांना आढळल्या. स्वच्छता विभागाच्या व्यवस्थापकाने याची माहिती रेल्वे पोलीस फोर्स आरपीएफला दिली. त्यानंतर पुणे विभागाच्या लोहमार्ग पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आझाद हिंद एक्सप्रेसच्या बोगीत सापडलेले जीवंत 11 काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पुणे लोहमार्ग पोलीस करत आहेत.