Home ताज्या बातम्या रेल्वेच्या विशेष तिकीट चेकिंग अभियानात तिकीट तपासनीसांनी (टीसी) पाच बनावट पोलिसांना पकडले

रेल्वेच्या विशेष तिकीट चेकिंग अभियानात तिकीट तपासनीसांनी (टीसी) पाच बनावट पोलिसांना पकडले

0

रेल्वेच्या विशेष तिकीट चेकिंग अभियानात तिकीट तपासनीसांनी (टीसी) पाच बनावट पोलिसांना पकडले

विना तिकीट लोकल प्रवास करणार्‍या बनावट पोलिसांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या लोहमार्ग पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. रेल्वेच्या विशेष तिकीट चेकिंग अभियानात तिकीट तपासनीसांनी (टीसी) पाच बनावट पोलिसांना पकडले आहे.

उपनगरी लोकल सेवामधून दररोज 70 लाख प्रवसी प्रवास करतात. रोज अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्यामुळे मध्य रेल्वेने मिशन मोडवर विना तिकीट प्रवास करणार्‍यांविरोधात विशेष तिकीट चेकिंग अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यात अनेक प्रवासी पोलिसांच्या बोगस ओळखपत्रावर विनातिकीट प्रवास करताना आढळून आले आहेत.

नुकतेच दादर रेल्वे स्थानकावर तिकीट तपासनीस नविनकुमार सिंग यांना विशेष चेकिंग मोहिमेसाठी दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 6 वर नेमण्यात आले होते. या दरम्यान सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास दादर रेल्वे स्थानकात सीएसएमटी फास्ट लोकल आली. तेव्हा मोटरमनच्या बाजूकडील पहिल्या वर्गाच्या डब्यातून एक प्रवासी स्थानकावर उतरला. त्यावेळी तिकीट तपासनीस सिंग यांनी याच्याकडे तिकीटची मागणी केली असता त्याने मी जीआरपी स्टाफ असल्याचे सांगितले. तेव्हाच सिंग यांनी त्याच्याकडे जीआरपी पोलिसांचे ओळखपत्र मागितले. तेव्हा त्याने सिंग यांच्याशी हुज्जत घातली.

या बोगस पोलिसाने आपले काळे रंगाचे बूट तसेच खाकी रंगाची पँट दाखविली. मात्र त्याच्या बेल्डवर कुठलाही नंबर नव्हता. त्याच्याकडे ओळखपत्र मागितले असता,तो ओळखपत्र दाखविण्यासाठी टाळाटाळ करु लागला होता. तिकीट तपासनीस सिंग यांनी त्या प्रवाशाची सखोल चौकशी केली असता तो बोगस असल्याचे निर्दशनात आले. सिंग यांनी यांची माहिती लाहमार्ग पोलिसांना दिली. तेव्हा पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोदविला आहे. पोलीस असल्याची बतावणी करून राहुल माली, कुमार मोरे, महेश कांगणे आणि राजू मदा यांना घाटकोपर, दादर, सीएसएमटी आणि ठाणे रेल्वे स्थानकावर तिकीट चेंकिगदरम्यान पकडण्यात आले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

या पाचही आरोपींकडून बनावट पोलिसांचे ओळखपत्रावर पोलिसांनी जप्त केले आहे. या ओळखपत्रावर पोलिसांचा असलेला स्टॅम्प त्यांच्याकडे कुठून आला याचा तपास लाहमार्ग पोलीस करत आहेत. तसेच पोलीस खात्याची बोगस कागदपत्रे तयार करण्यास त्यांना कोणी मदत तर करत नाही ना, याचाही तपास सुरू आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत जात असलेल्या बोगस पोलिसांची संख्या लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासकांना आता सावध झाले आहे.