Home ताज्या बातम्या रेल्वेत मैत्री अन् जर्मन पाहुणा आला थेट घरी, औक्षण करून परदेशी पाहुण्याचं स्वागत

रेल्वेत मैत्री अन् जर्मन पाहुणा आला थेट घरी, औक्षण करून परदेशी पाहुण्याचं स्वागत

0

जालना: चार वर्षांपूर्वी रेल्वेत मैत्री झाली अन् जर्मन पाहुणा थेट घरी दाखल झाला. 2016 मध्ये जालना जिल्ह्यातल्या परतूर मधील प्रणव दिरंगे या तरुणाची एका जर्मन व्यक्तीशी मैत्री झाली त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांचा संवाद वाढला आणि या परदेशी पाहुण्याला घरी आमंत्रित केलं गेलं. स्टोनस असं या जर्मन व्यक्तीचं नाव असून तो शिक्षणासाठी भारतात आला. दरम्यान भारतीय संस्कृतीनुसार औक्षण करून स्टोनसचं स्वागत करण्यात आलं. त्यामुळं अगदी भारावून गेला. भारतातील लोक खुप प्रेमळ असून सांस्कृतिक वारसा जाणणारा हा देश असल्याची भावना स्टोनसनं व्यक्त केली.