मुंबई दि. २९ कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली असून नागरिकांना शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या शंका निरसित करण्याच्यादृष्टीने हेल्पलाईन क्रमांक पुरविण्यात आले आहेत.
या क्रमांकावर नागरिकांना आपल्या शंका आणि तक्रारी नोंदविता येणार असून त्यावर विभागाद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत हेल्पलाईन कक्षाकडे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत या क्रमांकावर शंका किंवा तक्रारी नोदविता येणार आहे. या सेवेचा राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.
यासाठी पुरविण्यात आलेले दुरध्वनी क्रमांक असे आहेत..
1) निशुल्क क्रमांक -1800224950
2) बी.एस.एन.एल/एम.टी.एन.एल. (ग्राहकांकरीता )-1967
3) 022-23720582
4) 022-23722970
5) 022-23722483
6) 022-23721912
(खालील क्रमांक कोविड 19 कालावधी प्रर्यत कार्यरत राहतील तसेच सार्वजनिक व साप्ताहीक सुटीच्या दिवशी बंद राहतील)
7) 022-22023107
8) 022-22026048






















WhatsApp