Home गुन्हा रे रोड परिसरात 1.35 कोटी रुपयांचे मास्क जप्त आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई!

रे रोड परिसरात 1.35 कोटी रुपयांचे मास्क जप्त आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई!

0

गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 3 च्या पथकातील पोनि नितीन पाटील व पोशि भास्कर गायकवाड यांची उत्तम कामगिरी रे रोड परिसरात 1.35 कोटी रुपयांचे मास्क जप्त आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई!

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख

 कोरोनाचे संकट वाढण्याबरोबर मास्क व सॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्यांचेही उधाण आल्याचे आज पुन्हा एकदा समोर आले. मुंबई गुन्हे प्रकटीकरण कक्ष 3 च्या पथकातील पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पोलीस शिपाई भास्कर गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने रे रोड परिसरातून तब्बल 1 कोटी 35 लाख 65 हजार रुपयांचे एन 95 मास्क व थ्री प्लाय मास्क जप्त केलेे. मास्कच्या काळ्या बाजारात आणखी कोण सहभागी आहेत, याचा तपास सुरू असल्याचे कक्ष 3 च्या पथकाने सांगितले.
  कोरोनाच्या नावाखाली काळे धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्व पोलीस विभागांना दिले आहेत. त्यानुसार आदेशाचे पालन करत गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 3 चे पथक मास्क व सॅनिटायझरचा साठा करणाऱ्यांचा शोध घेत होते. तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पोलीस शिपाई भास्कर गायकवाड यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवडी परिसरातील रे रोड, दारूखाना येथील तहा इंटरनॅशनलमध्ये धाड टाकली. त्यावेळी 1 कोटी 27 लाख 90 हजार रुपयांचे (63 हजार 950 नग) एन 95 मास्क व (31 हजार नग) 7 लाख 75 हजार रुपयांचे थ्री प्लाय मास्क जप्त केले. या दोन्ही मास्कची किंमत 1 कोटी 35 लाख 65 हजार रुपये असल्याचे तपासादरम्यान उघडीकस आले आहे. जादा दरात विकण्यासाठी मास्कचा साठा केल्याप्रकरणी शिवडी पोलिसांनी (गु.र.क्र. 7/2020) अत्यावश्यक कायदा कलम 3, 7, 8, 9 नुसार गुन्हा दाखल करून मुर्तुझा अब्दुल तय्यब अत्तारी (36) याला अटक करण्यात आली.
 मास्काचा काळाबाजार सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संतोष रस्तोगी, गुन्हे प्रकटीकरणचे उपायुक्त शहाजी उमाप, सहाय्यक पोलीस आयुक्त (मध्य) शशांक सांडभोर, गुन्हे शाखा कक्ष 3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत, पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन भारती, सपोनि सोनाली भारते, पोउनि मोहसीन पठाण, पोउनि नवनाथ उघगे, पोउनि राजेंद्र बागुल, हवालदार गणेश गोरेगावकर, सुधीर पालांडे, पोलीस नाईक आकाश मांगले, संजय नागवेकर, विनायक जाधव, संजय शेळके, पोलीस शिपाई भास्कर गायकवाड, प्रमोद सकपाळ, वैभव बिडवे, चंद्रकांत काळे, चंद्रकांत गोडसे आदी पथकाने उजेडात आणला.