Home ताज्या बातम्या रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन कडून पुणे पोलिसांना ३ हजार मास्क

रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन कडून पुणे पोलिसांना ३ हजार मास्क

पुणे : कोरोना विषाणू साथीच्या काळात रात्रंदिवस कार्यरत असणाऱ्या पुणे पोलिसांना रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन कडून  ३ हजार मास्क देण्यात आले . रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन चे माजी अध्यक्ष शैलेश गांधी,रोटरी सदस्य सागर अत्रे यांनी   परिमंडळ तीन मधील  सह पोलीस आयुक्त मच्छिन्द्र चव्हाण यांच्याकडे हे मास्क सुपूर्द केले. तसेच कोथरूड परिसरातील झोपड्यांमध्ये वाटण्यात आले.  रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन ने कोरोना विषाणू साथीच्या काळात मदत कार्य करण्यासाठी अभियान सुरु केले असून त्या अंतर्गत हे मास्क वितरित करण्यात आले.