युरो कप २०२० च्या पत्रकार परिषदेत फ्रान्सचा खेळाडू पॉल पोग्बाने मंगळवारी रोनाल्डो प्रमाणेच टेबलवर ठेवण्यात आलेली बाटली हटवली. रोनाल्डोने कोका कोलाची बाटली हटवली होती. तर पोग्वाने पत्रकार परिषद सुरू होण्याआधी Heineken बीअरची बाटली हटवली.
वाचा- WTC Finalआधी तेंडुलकरचा टीम इंडियाला हा सल्ला
रोनाल्डोच्या व्हिडिओ प्रमाणे या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांना यासाठी पोग्बाचे कौतुक केले पण काही जण त्याच्यावर टीका देखील करत आहेत. जर्मनीविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर विजयाचा हिरो ठरलेल्या पोग्बाला सामनावीर घोषीत करण्यात आले. त्यानंतर तो पत्रकार परिषदेसाठी आला. तेव्हा टेबलवर ठेवण्यात आलेली बीअर दिसली, जी त्याने हटवली आणि खाली ठेवून दिली.
वाचा- WTC Finalचे काउंटडाउन सुरू झाले; निवडा तुमची प्लेइंग इलेव्हन
युरो कपमध्ये कोका कोला प्रमाणेच Heineken देखील अधिकृत स्पॉन्सर आहेत. आता या दोन्ही खेळाडूंवर UEFAकडून कारवाई केली जाऊ शकते.
वाचा- कोका कोलाच्या ऐवजी पाणी प्या- रोनाल्डो; कंपनीला २९ हजार कोटींचा चूना
रोनाल्डोचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोका कोला कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. कोकचे शेअर्स १.६ टक्क्यांनी घसरले. त्याची किमत २४२ बिलियन डॉलरवरून २३८ बिलियन डॉलरवर आली. भारतीय रुपयात त्यांना २९ हजार ३०० कोटींचे नुकसान झाले होते.