रोहित पाटील यांच्या साधेपणाची जनतेमध्ये वाढती लोकप्रियता

- Advertisement -

तासगाव : (डॉ विनोद खाडे)रोहित पाटील यांच्या साधेपणाची जनतेमध्ये वाढती लोकप्रियता
आपण बघतो हल्ली एखाद्या व्यक्ती ची ग्रामपंचायत सदस्य, सरपंच अथवा कोणत्याही पदावर निवड झाली झाला तरी लगेच हाय फाय गाडी,सोबत लवाजमा असतो,घरची परिस्थिती चांगली असेल तर नक्कीच, नसेल तर भलं कर्ज काढून का होईना, पण मोठेपणा करणारच,आणि त्यात मोठ्या बापाचा पोरगा असेल तर मग विचारूच नका,पण जर महाराष्ट्राच्या मंत्री मंडळातील एकेकाळी उच्च पदावर असणाऱ्या व्यक्ती चा पोरगा असेल आणि तो चक्क एस टी ने प्रवास करत असेल तर? पहा बातमी सविस्तर


हा साधेपणा जपणारा पोरगा आहे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री दिवगंत आर. आर. पाटील व तासगांवच्या विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांचा. नाव आहे रोहित पाटील.तासगाव तालुक्यातील च नव्हे तर महाराष्ट्रातील तरुणाई पासून वृद्धांपर्यंत सर्वानाच रोहित यांचा हा साधेपणा सगळ्यांना भुरळ घालत आहे. रोहित हे त्यांच्या अंजनी गावातुन सांगलीला जाताना चक्क एस.टी.ने प्रवास करताना रोहित पाटील दिसले. अतिशय विनम्र असलेले रोहित पाटील एस.टी.त आल्यावर प्रवाशांनाही हा सुखद धक्का बसला. इतक्या मोठ्या मंत्र्याचा मुलगा पण इतका शांत व साधेपणा निश्चितच राज्याला रोहितच्या रूपाने दुसरे आर.आर. आबा पहायला मिळत आहेत._अशा या साध्या व जनतेच्या विकासासाठी जनतेत मिसळणाऱ्या नेतृत्वाची समाजाला गरज आहे

- Advertisement -