Home बातम्या राष्ट्रीय ‘लंच टाइम’मुळे बचावले कर्मचारी; DGHSच्या ऑफिसात भीषण आग

‘लंच टाइम’मुळे बचावले कर्मचारी; DGHSच्या ऑफिसात भीषण आग


डीजीएचएसच्या कार्यालयाला प्रथम ही भीषण आग लागली.. नंतर ही संपूर्ण इमारतीत पसरली आणि वरचा मजला आगीने घेरला.

नवी दिल्ली : दिल्लीत आज दुपारी कड़कड़डूमास्थित डायरक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विसेजच्या (डीजीएचएस) इमारतीला बिशन आगलागली असून घटनास्थळी २ डझन अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे कार्य सुरु आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजलं नाही आहे. डीजीएचएसच्या कार्यालयाला प्रथम ही भीषण आग लागली. नंतर ही संपूर्ण इमारतीत पसरली आणि वरचा मजला आगीने घेरला. मात्र, लंच टाईमदरम्यान ही आग लागल्याने सुदैवाने बरेच कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी कार्यालयातून बाहेर पडले होते. जर काही वेळेआधी ही आग लागली असती तर ते बाहेर पडलेले कर्मचारी इमारतीत अडकून पडले असते अशी माहिती सूत्रांनी दिली.