
नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेत्री
अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू
केएल राहुल सध्या लंडनमध्ये आहेत. या दोघांच्या कथित अफेअरच्या बातम्या वारंवार येत असतात. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही खुलासा केला नाही. नुकतेच भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्मा याची पत्नी प्रतिमा सिंहने एक ग्रुप फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात अथिया शेट्टी आणि केएल राहुल देखील दिसत आहेत.
प्रतिमा सिंहने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. यात अथिया शेट्टी सेल्फी घेत असून केएल राहुलचा हात तिच्या खांद्यावर आहे. या फोटोत प्रतिमा सिंह आणि ईशांत शर्मादेखील दिसत आहेत. फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘राहों में उनसे मुलाकात हो गई।’ चाहत्यांना हा फोटो खूप आवडला असून यावर भरभरून कमेन्ट केल्या जात आहेत.
वृत्तानुसार, बीसीसीआयकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये केएल राहुल याने अथिया शेट्टीचा उल्लेख पार्टनर म्हणून नोंदवला आहे. अलीकडेच सुनील शेट्टी यांना अथिया राहुलसोबत इंग्लंडमध्ये आहेत का असा प्रश्न विचारला होता. यावर सुनील यांनी ई- टाइम्सला सांगितले की, ‘हे सर्व फक्त रिपोर्ट आहेत, मला त्यावर कोणतंही भाष्य करायचं नाही.’
अथिया शेट्टी आणि केएल राहुल बर्याचदा बाहेर फिरायला जाताना किंवा डिनरला जाताना दिसतात. त्याचवेळी दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेन्टही करत असतात. अथिया शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर २०१९ मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत तिचा ‘मोतीचूर चकनाचूर’ हा सिनेमा आला होता. यानंतर ती कोणत्याही सिनेमात दिसली नाही.
Source link