लग्नाच्या दोन महिन्यानंतर कामावर परतली सोनाली कुलकर्णी, अभिनेत्रीचा देसी लुक पाहून…

लग्नाच्या दोन महिन्यानंतर कामावर परतली सोनाली कुलकर्णी, अभिनेत्रीचा देसी लुक पाहून…
- Advertisement -


हायलाइट्स:

  • ७ मे रोजी सोनाली अडकली होती विवाहबंधनात
  • लग्नाच्या दोन महिन्यानंतर चित्रीकरणासाठी सज्ज झाली सोनाली
  • सोनालीच्या देसी लूकने चाहते झालेत घायाळ

मुंबई– मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणवली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनालीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना अक्षरशः भुरळ पाडली आहे. यावर्षी ७ मे रोजी कुणाल बेनोडेकर सोबत लग्नगाठ बांधत सोनालीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. सोनालीच्या नववधूच्या साध्या परंतु, हटके लुकची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा सोनाली सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनालीच्या हटके फोटोंनी तिने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. चाहतेदेखील सोनालीच्या देसी लूकचं कौतुक करत आहेत.

अरेरे! वाढदिवसालाच रिया चक्रवर्ती झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले..


चार जणांच्या उपस्थितीत लग्न करत सोनालीने चाहत्यांना आदर्श दिला. सोनालीच्या दुबईमधील घराची देखील चाहत्यांमध्ये चर्चा होती. लग्नाला दोन महिने पूर्ण झाले नाहीत तोच सोनाली पुन्हा एकदा कामावर रुजू झाली आहे. सध्या सोनाली जम्मू येथे आहे. तिथे सोनाली तिच्या आगामी प्रोजेक्टचं चित्रीकरण करत आहे. या चित्रीकरणासाठी सोनालीने पंजाबी मुलीचा पेहराव केला आहे. सलवार- कमीज आणि ओढणी मधील सोनालीचा देसी लुक भलताच भाव खाऊन गेला आहे. भारत- पाकिस्तान सीमेवर चित्रीकरण करत असलेल्या सोनालीने शेअर केलेले फोटो पाहून चाहते मात्र घायाळ झाले आहेत.


उंच वाढलेल्या पिकांमधील फोटो शेअर करत सोनालीने तिला आपल्या देशाचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. सोनालीचे हे फोटो चाहत्यांमध्ये वायरल झाले आहेत. यापूर्वी सोनालीच्या मिनीमूनचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेत होते. कधी निळ्याशार समुद्रकिनारी झोके घेताना तर कधी पतीसोबत ट्रेकिंग करतानाचे फोटो सोनालीने चाहत्यांसोबत शेअर केले होते. लग्नानंतर पुन्हा एकदा कामासाठी सज्ज झालेली सोनाली प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येतेय, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.

सिलेंडर मॅन सागर दिसणार प्रवीण तरडेंच्या आगामी चित्रपटात





Source link

- Advertisement -