लम्पी चर्मरोग : गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण – पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

लम्पी चर्मरोग : गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण – पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
- Advertisement -

मुंबई, दि. 5 : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आजअखेर एकूण 144.12 लक्ष लस  उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 139.42 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 100 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी दिली.

मंत्री श्री. विखे – पाटील म्हणाले, राज्यामध्ये दि. 05 डिसेंबर 2022 अखेर 35 जिल्ह्यांमधील एकूण 3939 संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 3,50,171 बाधित पशुधनापैकी एकूण 2,67,224 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 11214 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईची 28.40 कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली असल्याचे श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

- Advertisement -